कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतचे लिपिक सुरेश महादेव झुलपे (वय55, रा. पावशी खोतवाडी) यांनी बांबुळी कोचरेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर कोकणकन्या एक्सप्रेस खाली झोकून देत आत्महत्या केली असुन त्यानी आत्महत्या का केली? याचे नेमके कारण समजू शकलेले नसून या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी मयत सुरेश यांचा भाऊ शिवाजी झुलपे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात खबर दिली की, त्यांचे भाऊ सुरेश झुलपे हे कुडाळ नगरपंचायती येथे लिपीक या पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ते पावशी खोतवाडी येथील राहत्या घरातुन कुडाळ नगरपंचायत येथे कामाला बाहेर पडले होते.दरम्यान कोकणकन्या एक्सप्रेसच्या मोटरमनने कुडाळ रेल्वे स्टेशन ला कळविले की, बांबुळी कोचरेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर कोकणकन्या एक्सप्रेस खाली एका व्यक्तिने झोकून दिले आहे. रेल्वे प्रशासनाने याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. सदरची माहिती मिळताच घटनास्थळी कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस मंगेश जाधव व इतर पोलिसांनी जात पंचनामा केला. मात्र सदरची व्यक्ती कोण आहे याची ओळख पटत नव्हती. यावेळी तेथे असलेल्या मोबाईल मधील नंबरवर फोन केला असता ती व्यक्ती सुरेश झुलपे असल्याची माहिती मिळाली. व पोलिसांनी घडलेल्या घटनेची सर्व माहिती त्यांच्या मुलीला व भावाला दिली. माहीती मिळताच घटनास्थळी सुरेश यांचा भाऊ शिवाजी झुलपे यांनी जात मृतदेहाच्या तिथे असलेल्या ओळखपत्रावरून ते सुरेश झुलपे असल्याचे सांगितले.

सुरेश झुलपे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजु शकले नाही याप्रकरणी कुडाळ पोलिस अधिक तपास करीत असुन या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.मोटारसायकल कोठे आहे?
सुरेश झुलपे हे पावशी येथुन कुडाळ ला मोटारसायकलने यायचे. त्यांनी बांबुळी येथे ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या परिसरात त्यांची मोटारसायकल आढळून आली नाही. त्यामुळे ते कशाने आले त्यांची मोटारसायकल कुठे आहे याचा ही तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page