वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जि.प.मतदार संघातील शिरोडा ग्रा.पं. सदस्या तथा उपशाखा संघटिका प्राची प्रकाश नाईक यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे,अशी माहिती वेंगुर्ला महिला आघाडी प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,शिरोडा ग्रा.पं. सदस्या प्राची नाईक हिच्या सततच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे, पक्षाला बाधा येईल अशी वक्तव्ये करणे,पक्षाच्या वरिष्ठांच्या विरोधात बोलणे,संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता आंदोलन छेडणे आदी सर्व बाबींचा विचार करता शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांच्या आदेशान्वये प्राची नाईक यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे,असे वेंगुर्ला महिला आघाडी प्रमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.