खानोलकरांचा “आड दशावतार” राज्यात प्रथम..

खानोलकरांचा “आड दशावतार” राज्यात प्रथम..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला – डॉ. बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठ अतंर्गत मराठी भाषा दिनाचे औचित्य साधुन लोककलांचा महाराष्ट्र उपक्रमाद्वारे विविध महाराष्ट्रातील लोककला विषयी शोधनिबंध व निंबध पाठवण्याचे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातुन केले होते.
या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या दशावतार लोककलेचे युवा अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांनी आद्य म्हणजेच “आड दशावतार” म्हणजे काय त्याच्या निर्मितीमागचा हेतु त्याची वैशिष्ट्ये व विनोदी शैली या पैलुवर अभ्यासपुर्ण लेखन केले आणि हाच शोधनिबंध या स्पर्धेत राज्यात प्रथम विजेता ठरला.
प्रा.वैभव खानोलकर खानोली गावचे सुपुत्र असुन नेमळे उच्च माध्यमिक विद्यालय व वेंगुर्ला न्यू इग्लिश स्कूल उभादांडा येथे अध्यापन करतात.यापुर्वी त्यांनी दशावतार लोककलेशी संबधित सादर केलेले शोधनिबंध राज्यात प्रथम आले होते.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस गुगल पे च्या माध्यमातुन खानोलकर यांना देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.या स्पर्धेत यश मिळवणा-या प्रा.वैभव खानोलकर यांना खानोलकर दशावतार मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री,नटश्रेष्ठ पप्पु नादोसकर, दत्तप्रसाद शेणई,पप्पु घाडीगांवकर,उदय राणे कोनसकर,सुधीर तांडेल आणि प्रा.बी.एन्.खरात यांनी मार्गदर्शन केले. प्रा.खानोलकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल कलावंत, दशावतारी रसिकां बरोबरच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..