जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांनी दिली माहिती..
कणकवली / –
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा 3 एप्रिल रोजी होणारा 51 वा वाढदिवस कोविडच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर हे राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. जिल्ह्यात विशेषता कणकवली विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रम राबविणार अनंत पिळणकर हे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा केला जाणार आहे हे असे यावेळी रुपेश जाधव यांनी सांगितले.