महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दोडामार्ग तालुकाध्यक्ष पदी तुळशीदास नाईक..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दोडामार्ग तालुकाध्यक्ष पदी तुळशीदास नाईक..

सचिव पदी प्रशांत गवस,खजिनदार पदी सुमीत दळवी, तर उपाध्यक्ष गोविंद शिरसाट..

दोडामार्ग /-

महाराष्ट्र राज्य राज्य मराठी पत्रकार संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत जाहीर झाली असून अध्यक्षपदी दै.रत्नागिरी टाईम्स चे तालुकाप्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास नाईक यांची वर्णी लागली आहे, तर खजिनदार पदी दै. सिंधुदुर्ग समाचार व ग्लोबल महाराष्ट्र चे सुमीत दळवी, सचिव पदी लोकसंवाद चे प्रशांत गवस व उपाध्यक्ष पदी माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगचे गोविंद शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी आबा खवणेकर यांनी संघाची ध्येय धोरणे सांगताना पत्रकार या घटकाला शासनाच्या योजना मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे व हा पत्रकार संघ पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत राहील असे ते म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे जिल्हा सचिव शिरीष नाईक, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गवस यांनी अभिनंदन केले, यावेळी पत्रकार सुधाकर धरणे, सुयश गवस, नारायण नाईक आदि उपस्थित होते.

अभिप्राय द्या..