सावंतवाडी एसटी डेपोचे काम सात दिवसात पूर्ण करा अन्यथा मनसेच्या वतीने म्हशी / गाई बांधून आंदोलन करणार.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा ईशारा..

सावंतवाडी एसटी डेपोचे काम सात दिवसात पूर्ण करा अन्यथा मनसेच्या वतीने म्हशी / गाई बांधून आंदोलन करणार.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा ईशारा..

कुडाळ /-

सावंतवाडी एसटी डेपोचे काम सात दिवसात पूर्ण नाही केल्यास सावंतवाडी डेपोच्या येथे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना त्या ठिकाणी म्हशी आणि गाई बांधून आंदोलन करणार आहे.असा ईशारा आज आपल्या प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी आज कुडाळ येथे,सांगितले.सध्या सावंतवाडी डेपो चे काम हे अर्धवट स्थितीत असून त्या कामात अनेक त्रुटी आहेत.त्यामुळे शिफ्टिंगचे काम रखडले आहे.एसटीच्या गाड्या धुवायला पाण्याची कमतरता आहे.विजेचे काम देखील अर्धवट परिस्थितीत आहे.शासनाच्या पैशाची विलेवाट सुरू आहे.सावंतवाडी स्टँड ला आलं की असे वाटतेय की ,हे स्टँड म्हणजे एक पार्किंगची स्टेशन बनले आहे.याची एसटी प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याची गंभीर दखल घेईल असा ईशारा आज मनसे कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..