कुडाळ /-
जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यत कोरोना चाचणी बंधनकारक केली असून चाचणी न केल्यास व्यवस्थापनावर कारवाईचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात आज कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आज ३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना भेट देत.व्य|पारी वर्गाच्या समस्या जिल्हाधिकारी यांनां सांगितल्या.व यावर फेर विचार करावा असे सांगण्यात आले.
वास्तविक पाहता कोरोना व्हायरस हा या चाचणी नंतर होणार नाही असे कोणतेही वैद्यकीय प्रमाण नसताना व जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम चालू असताना व्यापारानां नाहक त्रास देणे चुकीचे आहे असे सांगण्यात आले.
सदरील आदेशामुळे कुडाळ तालुक्यातील व्यापारी वर्गातून असंतोष निर्माण झालेला दिसून येतो.गेल्या एका वर्षामध्ये व्यापारी वर्ग हा पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे. अशाच प्रकारे व्यापान्यांची वाताहात होत राहीली तर आमा व्यापाऱ्यांना आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. एका ठिकाणी लसीकरणाची मोहिम सरकारने हाती घेतली असून आता पुन्ता कोरोना चाचणी अनिवार्य करणे जाचक वादत आहे. त्यापेक्षा व्यापारी वर्ग व त्यांचे कर्मचारी यांना लवकरात लवकर लस देण्याची सुविधा करावी अशी कुडाळ तालुका व्यापारी वर्गाकडून विनंती करण्यात आली आहे.
कुडाळ तालुक्याचा विचार करता जवळपास २५०० ते ३००० हजार छोटे मोठे व्यापारी असून सर्व कामगार वर्ग वैगेरे घरून २५ ते ३० हजार जणांची कोरोना चाचणी करावी लागणार, तसेच सबरध्या कोरोना चाचणीचा अवधी फक्त ७२ तासा पूरता मर्यादीत असल्याने पुन्ा कोरोना चाचणी करणे श्य होणार नाही. सक्तीच्या RTPCR चाचणी करण्यापेक्षा तालुक्यातील व्यापाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस द्यावी.
म्हणून आपणास विनंती करतो की, कोरोना चाचणी करण्याची सक्ती न करता त्यावर उपाययोजना व व्यापारी वर्ग व कर्मचाऱ्यांना लसीकरण करावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.