कुडाळ /-
आज कुडाळ शहरात वाहतुक पोलिसांनी मोटरसायकल स्वार आणि पादचारी विनामस्क फिरणाऱ्यांनवर धकड कारवाई केली आहे.आज कुडाळ चा बुधवारचा आठवडा बाजार असल्याने कुडाळ तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून लोक आपला आठवडा बाजार करण्यासाठी शहराच्या ठिकाणी येतात ,तसेच ईतर बाहेच्या तालुक्यातुन देखील व्यापारी वर्ग हे मोठ्या प्रमाणात येतात,परिणामी गर्दीचे प्रमाण देखील जास्त होते.आज बुधवारच्या आठवडा बाजाराला जास्त गर्दीअसल्याने कोणत्याही प्रकारचे सोशल distan चे पालन केले नव्हते.यात कुडाळ पोस्ट ऑफिस ते एस. ऐन. देसाई चौक ,कुडाळ पोलीस स्टेशन दरम्यान आज कुडाळ महिला वाहतूक पोलिसांनी विनामस्क फिरणारे पादचारी , मोटरसायकल स्वार ,तसेच मोटरसायकल वरून फोन वर बोलणारे यांच्यावर कुडाळ वाहतूक पोलिसांनी धकड कारवाई केली आहे.