मुंबई /-

अमृता फडणवीस यांनी गैरव्यवहार केल्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरव्यवहार होतो का? अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांनी एकनाथ खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.आपल्या टिवीटर च्या माध्यमातून अमृता फडणवीसांनी, खडसेंनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. “तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही. सर्वांचे भले होवो,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी अपल्या टिवीटर च्या माध्यमातून केले आहे.

काही दिवसांपासून खडसे यांनी अचानक देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली, मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसे यांनी केला होता. त्यालाच अमृता फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.फडणवीस यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच. बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपात युती आहे. त्यामुळे आमचे सरकार येईल, अशी आशा करतो. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, त्यांनी महाराष्ट्रात जे राजकारण खेळले, याचे तिकीट कापायचे, त्याचे तिकीट कापायचे, याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असे तिथे होऊ नये, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीस यांना जोरदार चिमटा

त्यावर फडणवीस यांनी खडसेवर चांगलाच पलट वार केला आहे. ‘माझ्यात फार संयम आहे. घरची धुणी मी रस्त्यावर कधीच धूत नाही’, असे फडणवीस म्हणाले. खडसे हे आमचे ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच महत्त्वाचे आहेत . त्यामुळे मी त्यांच्यावर टीका वा टिपण्णी करणार नाही.तसेच ते ज्या मनीषा भंगाळे प्रकरणाबाबत ते बोलत आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.

भंगाळेने आरोप लावल्यानंतर एडीजी एटीएसची कमिटी बनवून मी १२ तासांत रिपोर्ट द्यायला लावला. १२ तासात खंडसेना क्लीन चिट मिळाली आणि भंगाळेला अटक झाली. तेथून पुढे तो किती दिवस जेल मध्येच होता. असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भंगाळेच्या प्रकरणात मिळालेल्या क्लीन चिट मिळूनही ते लॉन्ड्रीतली किंवा ड्राय क्लीनिंगची क्लीन चिट म्हणत असतील तर काय बोलावं, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page