रत्नागिरी /-

भाजपमधील एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शितयुद्धाने भाजपमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. यात आज शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी उडी घेतली आहे. भाजपमधील ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर ही वेळ येत असेल तर ते दुदैवी आहे. त्यामुळे खडसे यांनी भविष्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, अशी शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सामंत यांनी खडसेंना दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी उपस्थित होते. आपल्यावर होणार्‍या अन्यायारोधात श्रेष्ठींकडे आपण दाद मागणार असे स्फोटक वक्तव्य खडसे यांनी केले

अंगुलीनिर्देश देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. घरची धुणी आम्ही रस्त्यावर धुत नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केला होता. भाजमध्ये पक्षांतर्गत सुरू असलेल्या शितयुद्धामध्ये आता शिवसेनेने उडी घेतली आहे. भाजपमधील जेष्ट एकनाथ खडसे यांच्यावर अंतर्गत कुरघोडीमुळे ही वेळ येत असेल तर ते दुदैवी आहे. त्यामुळे खडसेंनी भविष्यात काही विचार केला तर त्यांनी शिवसेनेत यावे, अशी ऑफर उदय सामंत यांनी त्यांना दिली. ज्यांच्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, त्या खडसेंवर ही वेळ येणे दुर्दैवी आहे. पण खडसेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ असल्याचा उपरोधिक टोलाही शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांनी फडणवीस यांना नाव न घेता लगावलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष काही काम नसल्याने विरोधकांना दुसरा मुद्दा नाही असा उपरोधीत टोला त्यांनी हाणला. संत महंतांनी मुख्यमंत्र्यांना अयोद्धेत येण्यास बंदी घातली. या प्रकरणी लकवकर मुख्यमंत्री भूमिका जाहीर करतील, असेही सामंत यांनी सष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page