वेंगुर्ले /-
खारफुटी तोड हा महाभयंकर विषय आहे, ही तोड रोखण्यासाठी शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वेंगुर्ला येथील कृषि भूषण तथा सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे यांनी दिला आहे.कोकण समुद्रकिनाऱ्यावर व पर्यायाने मालवण येथील रेवंडी खाडीपात्रात खारफुटी तोडीचा प्रकार घडला आहे. या पार्श्वभूमीवर श्री गावडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आंध्रप्रदेशात खारफुटी तोडीचे गंभीर परिणाम भोगावे लागले होते. तशीच परिस्थिती याठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी तोड रोखण्यासाठी संबंधितावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात कायद्याचे पालन किंवा अंमलबजावणी शासनाच्या संबंधित विभागाने करावे,अशीही त्यांनी मागणी केली आहे.