माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर यांचे निधन…

माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर यांचे निधन…

आचरा /-

माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर वय ७४ यांचे रविवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य माजी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सिंधुदूर्ग जि.प. माजी शिक्षण आरोग्य सभापती, रेकोबा हायस्कूल मालवणचे माजी मुख्याध्यापक, आचरे इंग्लिश मिडीयम स्कूल चे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे माजी अध्यक्ष, आशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. समाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. ते सेवांगण मालवण य.बा.चोपडे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते होते. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व रविवारी काळाच्या पडद्याआड गेले.
त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ, तीन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांचे ते जेष्ठ बंधू होत.

अभिप्राय द्या..