कुडाळ /-
डुक्कराला लावलेल्या विजेच्या फासकीचा शॉक लागून कविलकाटे बावकरवाडी येथिल पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला असून अजून एक जण बाव येथील जखमी असल्याने त्याला गरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मृत्यू मद्धे श्री.दीपक मातोंडकर वय 58 तर त्यांचा मुलगा भगवान मातोंडकर वय 36 हे दोघे पिता-पुत्र मृत्युमुखी पावले आहेत.ही घटना आज सकाळी कविलकाटे-बाव परिसरात घडली.याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहेत.सदरच्या मृत्यूची कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल होत पंचनामा केला आहे.