कुडाळ /-

ज्ञानाला श्रमाची जोड दिल्यास अपेक्षित यश संपादन करता येते. परिपूर्ण तयारी स्पर्धेतील यशस्वीतेची नांदी असते. त्यासाठी श्रम, खडतर तपश्चर्या महत्त्वाची असते. असे उद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आयोजित त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नियोजनबद्ध अभ्यासाची गरज असल्याचे सांगत प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्याबद्दल उपस्थित प्रशिक्षणार्थींचे व वाढदिवसाच अभिष्टचिंतन केल्याबद्दल शिक्षण संस्थेचे त्यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर संदेश पारकर, उमेश गाळवणकर, उमेश नाईक, अनंत भोसले, श्रीराम विश्वासराव, सुधाकर नर, विलास जाधव, राजन नाईक छोटू पारकर , अवधूत मालंडकर,पराग म्हापसेकर,मंजुनाथ फडके व इतर सहकारी उपस्थित होते यावेळी बॅरिस्ट नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे उमेश गाळवणकर यांनी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन वैभव नाईक यांचा सत्कार केला व विद्यार्थ्यांनी तयार केलेला केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना संदेश पारकर यांनी “जनसामान्यांशी बांधले गेलेले आमदार, लोकांच्या घराघरात पोहोचलेले आमदार, त्यांना लोकसेवा करण्यासाठी आपण दीर्घायुष्य चिंतुया. त्यांचं अभिष्टचिंतन करुया. जेणेकरून विकासाची गंगा सिंधुदुर्गामध्ये आणण्यामध्ये त्यांना बळ मिळेल, शक्ती मिळेल, दीर्घायुष्य लाभेल. ‌त्यांच्यावरची आपली निष्ठा व प्रेम असेच राहू द्या.” असे सांगत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध शिक्षणक्रमाच्या वतीने नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मीना जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला. तसेच बँकिंग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक अक्षर गौड, ओमकार तपकिरे यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शिक्षण क्रमातील विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी सोशल डिस्टंन्श चे नियम पाळून बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page