वेंगुर्ले पं.स. उपसभापती सिद्धेश परब यांच्या पाठपुराव्यामुळे म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले बसफेरी सुरु वेंगुर्ला म्हापसाहून सायंकाळी ५.३० वा.म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले ही बसफेरी त्वरित सुरु करण्यात यावी,याबाबत उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव मांडला होता.तसेच या भागातील प्रवासी,नोकरदार वर्ग यांच्या हिताच्या दृष्टीने सदर बसफेरी त्वरित सुरु करण्यात यावी,याबाबत एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.त्यानुसार संबंधित विभागाच्या मागणीनुसार व पत्रव्यवहार बाबत सिद्धेश परब यांनी पाठपुरावा करुन ही बसफेरी एस.टी.विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. दरम्यान ही बसफेरी म्हापसातून सुरू करण्यात आल्याने वेंगुर्ले,शिरोडा,सातारडा आदी भागातील प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.याबद्दल शिरोडा येथे प्रवाशांमार्फत सिद्धेश परब यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी एस. टी. ड्रायव्हर, कंडकटर, प्रसाद कांबळी, श्रावणी परब, भाई शिरगावकर, कमलाकांत मुर्डेकर, दर्शना शेट्ये, मुळीक, अंकिता परब, जाधव ,आदींसह पुरुष,महिला प्रवासी उपस्थित होते.याबाबत सर्वच प्रवाशांनी सिद्धेश परब यांचे आभार व्यक्त केले.