वेंगुर्ला /-
स्त्रियांचे संवैधानिक अधिकार,मानवी हक्क संरक्षण कायदा,विवाह संबंधीचे कायदे ,स्त्रियांचे मालमत्ता व वारसा हक्क कायदे, कुटुंब न्यायालये, राष्ट्रीय महिला आरोग्य कायदे,
कामगार स्त्रियांचे अधिकार व हक्क कायदे,हुंडा, बालविवाह,कौटुंबिक हिंसासार व अन्य बाबतीत स्त्रियांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे,असे प्रतिपादन डॉ.सई लिंगवत यांनी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, विद्यार्थी कल्याण विभाग, बहिःशाल शिक्षण मंडळ योजना व कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.सई लिंगवत यांनी ‘महिला व कायदे ‘ या विषयावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.व्याख्यानमाला व परिसंवादाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर यांनी केले. यावेळी बहिःशाल शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. डॉ. संजीव लिंगवत, कॉलेजच्या उपप्राचार्या व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पूजा कर्पे, डॉ.सोनाली सावंत, डॉ. मनोज आरोसकर, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. सतिश पाटील, डॉ. रवींद्र बुरूड,डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ. दिपाली देसाई, डॉ.राखी माधव,डॉ.समता धुरी,डॉ. सिध्दी सावंत, परेश नांदोस्कर आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या दुस-या ऍड.मनिष सातार्डेकर यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रियांका जगताप, सुत्रसंचालन पराग नाडकर्णी व आभार स्नेहल गोसावी यांनी
मानले.