मालवण येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने होणार साजरा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..

मालवण येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने होणार साजरा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..

मालवण /-

मालवण, ता. २५: सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य संस्था व साहित्य सहवास मसुरे व समस्त महिलांच्यावतीने आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस उद्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. यानिमित्त सायंकाळी चार वाजता रॉकगार्डन येथे वड-पिंपळाची झाडे लावत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जाणार आहे.

सध्याच्या काळात विकासाच्या नावाखाली वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. मात्र त्याप्रमाणात लागवड होत नसल्याने त्याचे दुष्परिणाम मानवालाच भोगावे लागत आहेत. वृक्षांच्या बेसुमार तोडीमुळे विविध पक्षांची निवासस्थानेही नष्ट होत चालली आहेत. अशा परिस्थितीत भविष्याचा विचार करता नव्या पिढीसमोर वृक्षांचे महत्त्व बिंबविणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने आमदार वैभव नाईक यांचा उद्या होणारा वाढदिवस वड- पिंपळ या वृक्षांची लागवड आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता रॉकगार्डन येथे आमदार नाईक यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड केली जाणार आहे.

अभिप्राय द्या..