कोकिसरे गावातून एस.टी. बस.सेवा सुरू करावी:-ग्रामस्थांचे विभाग नियंत्रकांना निवेदन..

कोकिसरे गावातून एस.टी. बस.सेवा सुरू करावी:-ग्रामस्थांचे विभाग नियंत्रकांना निवेदन..

वैभववाडी/ –

कोकिसरे महालक्ष्मी मंदिर अशी एस .टी. बस सेवा पूर्ववत सुरू करावी ,तसेच खांबाळे गावातून फोंडा कणकवली ला जाणाऱ्या सर्व एस. टी. बस फेऱ्या व्हाया कोकिसरे मार्गे सोडण्यात याव्यात. या मागणीचे निवेदन कोकिसरे ग्रामस्थांच्यावतीने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग रसाळ यांना देण्यात आले आहे .
वैभववाडी – कोकिसरे ,महालक्ष्मी मंदिर अशी एस.टी. बस सेवा या पूर्वी सुरू होती, मात्र कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्यामुळे शाळेत जाणारी मुले नाहीत त्यामुळे ही फेरी बंद करण्यात आली. सध्या कोकिसरे गावची लोक संख्या सुमारे दीड हजारच्या आसपास आहे.कामा निमित्त दर दिवशी वैभववाडी तालुक्यात शेकडो लोक खाजगी वाहनाने येत आहेत.खाजगी वाहनातून प्रवास करताना आर्थिक फटका जनतेला सहन करावा लागत आहे.तरी वैभववाडी एस.टी. बस स्थानकातून दर दिवशी सकाळी 9:30 वाजता दुपारी 1 वाजता व सायंकाळी 5 :30 वाजता आशा नियमित फेऱ्या सोडण्यात याव्यात. तसेच वैभववाडी स्थानकातून खांबाळे मार्गे जाणाऱ्या सर्व एस.टी. बस व्याया कोकिसरे गावातून खांबाळे गावातून फोंडा,कणकवली आशा सोडण्यात याव्यात ,तसेच कोकीसरे ग्रामस्थांना वैभववाडी – तरळे असा प्रवास करावा लागत आहे .अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना नेते अशोक शिंगरे,वैभववाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव ,शिवसेना माजी उपतालुका प्रमुख श्रीराम शिंगरे,दत्ताराम सावंत,अनंत नांदलस्कर आधी मान्यवर उपस्थित होते.
फोटो:सिंधुदुर्ग विभाग नियंत्रण रसाळ यांना निवेदन देतांना कोकिसरे ग्रामस्थ.छाया:(मोहन पडवळ)

अभिप्राय द्या..