म्हापण गावात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने म्हापण बाजारपेठ येथे आरोग्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली. गावात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व गावात जास्तीत जास्त लोकांना त्रास होऊ नये म्हणून तसेच नागरिकांच्या हितासाठी व म्हापण बाजारपेठ ही पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असल्याने आजच्या सदर चर्चेत म्हापण पंचक्रोशीतील आरोग्याच्या दृष्टीने दि. १४ ते १८ सप्टेंबर पर्यत पुर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त मेडिकल सुरू ठेवण्यात येतील असे ग्रामस्थ, व्यापारी, रिक्षा युनियन आदी प्रमुख संघटना यांच्या उपस्थितीत सर्वांनुमते एकमताने म्हापण बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती म्हापण सरपंच अभय ठाकुर यांनी दिली आहे. तसेच म्हापण पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या गावात कोरोनाचा प्रादृभाव रोखण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती असेही सरपंच ठाकुर यांनी म्हटले आहे.