नवी दिल्ली /-

देशात कोरोनाचं संकट असतांना महागाईसुद्धा वाढली आहे. आर्थिक मंदीत सामान्य माणसांना मोठा फटका बसला आहे. अशा वातावरणात दिलासा देणारी बातमी आलीय.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे तेलाचे भाव गडगडले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत किंमतींवरही होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 रुपयांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ( Petrol-diesel prices likely to fall by Rs 2)

असा निर्णय झाला तर तो सर्व सामान्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. कोरोनामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वाहतुकदारांना फटका बसला असून त्यांनाही याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कोरोनामुळे लोकांच्या बाहेर पडण्यावर मर्यादा आल्याने वाहने कमी प्रमाणात रस्त्यांवर धावत आहेत. त्याचबरोबर सगळं अर्थकारणच बिघडल्याने त्याचा परिणाम तेलांच्या किंमती गडगडण्यावर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page