वेंगुर्ला / –
वेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ला येथे २२ मार्च रोजी जागतिक जलदिन निमित्त पाणी जपून वापरण्याबाबत तसेच पाण्याचा सुयोग्य वापर करून याची जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली.२२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जगातील शुद्ध व सुरक्षित पाण्यासाठी जन समुदायामध्ये जागृती निर्माण केली जाते. या अंतर्गत २२ मार्च ते २७ मार्च २०२१ या कालावधीत विविध स्तरावर उपक्रमांचे आयोजन केले जाते. याअंतर्गत हा शपथ कार्यक्रम पंचायत समितीच्या बॅ नाथ पै सभागृहात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित घेण्यात आला. यावेळी सभापती अनुश्री कांबळी, उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब, गटविकास अधिकारी उमा पाटील, माजी उपसभापती तथा पं. स. सदस्या स्मिता दामले, कृषी अधिकारी विद्याधर सुतार, कक्ष अधिकारी रेडकर, अधीक्षक, विस्तार अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.