मालवण /-

कोणत्याही राज्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील नागरिक भारतात कोठेही शासकीय रेशन दुकानावर धान्य खरेदी करू शकणार आहेत. रेशनकार्ड आधार जोडणी व थम्ब यंत्रणेमुळे धान्य वितरणात अधिक पारदर्शकता आली आहे. असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी कातवड येथे बोलताना केले.

मालवण तालुका रेशन दुकानदार संघटना अध्यक्ष
सुनील मलये यांच्या कातवड येथील रेशन दुकानांमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड व राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी तहसीलदार अजय पाटणे, मालवण पुरवठा अधिकारी संतोष खरात, अव्वल कारकुन शुभानंद कोयंडे यासह सुनिल मलये, अमित गावडे, रोहीत पेडणेकर, प्रथमेश पेडणेकर, बाबु लुडबे, बबन परब, सुभाष गिरकर, विलास पांजरी, कार्ड धारक मोहन आचरेकर, शंकर लोके, रंजना पाटकर, बाबु चव्हाण, बाळा मलये, मंगला धुरी, आसावरी कांबळी, सुभाष परब व अन्य ग्राहक सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून उपस्थित होते.

तहसीलदार अजय पाटणे यांनी रेशन धान्य वितरण बाबत शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी रेशन धान्य दुकानदार यांच्या सेवेबाबत समाधान व्यक्त करत कौतुकही केले. ग्रामीण भागात रेंज सुविधा व अन्य समस्या असताना ग्राहकांना सुलभ धान्य वितरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित ग्राहकांनी लॉकडाऊन काळात शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत धान्य वितरण बाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page