कुडाळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कुडाळ हळदीचे नेरूर येथे छापा टाकत 5250 रू ची दारु जप्त..

कुडाळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कुडाळ हळदीचे नेरूर येथे छापा टाकत 5250 रू ची दारु जप्त..

कुडाळ /-

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने हळदीचे नेरूर येथे छापा टाकत 5250 रू ची दारु जप्त केली. याप्रकरणी हळदीचे नेरुर येथील सुरेश सखाराम घाडी यांच्या वर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दु ३.३० वा केली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला सुरेश घाडी यांच्या दुकान मागे दारू दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शाहू देसाई पोलिस श्री कोयंडे, श्री केसरकर श्री नार्वेकर,श्री पालकर,श्री गावडे यांनी छाप टाकला. यामध्ये गोवा बनावटीची ५ हजार २५० रू दारू मिळून आली. याप्रकरणी सुरेश घाडी यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शाहू देसाई यांनी दिली.

अभिप्राय द्या..