सिलिका मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहणारे कॅबिनेट मंत्री डंपर/मालवाहक व्यवसायिकांच्या पाठीशी राहतील का.;मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल

सिलिका मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहणारे कॅबिनेट मंत्री डंपर/मालवाहक व्यवसायिकांच्या पाठीशी राहतील का.;मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल

कुडाळ /-

गेल्या वर्षभरापासून आज पर्यंत कोरोना काळात संपूर्ण कर्जाच्या ओझ्याखाली दडपून गेलेल्या दागिने गहाण ठेवून कसाबसा चरितार्थ चालविणाऱ्या डंपर व मालवाहक व्यावसायिकांवर सिंधुदुर्ग आरटीओ परजिल्ह्यातील भरारी पथके नेमून कठोर दंडात्मक कारवाई करून नेमकं काय साध्य करू पाहत आहे.एकीकडे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार सर्व मालवाहक गाड्यांना करामध्ये त्याचप्रमाणे पासिंग मध्ये सूट देऊन सामान्य व्यवसायिकांना सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे.तर मग सिंधुदुर्ग आरटीओ परजिल्ह्यातील पथकामार्फत पोलिस जसे चोरांचा पाठलाग करतात तसा ही आरटीओची भरारी पथके पाठलाग करून या जिल्ह्यातील स्थानिक मालवाहू गाड्यांवर जी कारवाई करत आहे.याचा नेमका उद्देश काय? की सिंधुदुर्ग आरटीओ केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही का?

इतकी जर कर्तव्यनिष्ठा दाखवून सिंधुदुर्ग आरटीओ ला कारवाई करून प्रामाणिकपणे शासनाच्या तिजोरीत महसूल ची वाढ करायची असेल तर गोवा तसेच इतर राज्यातून ये-जा करणाऱ्या ट्रॅव्हलर बसेस यांचा मनोरंजन कर आंतरजिल्हा परमिट कर योग्य प्रकारे वसूल केल्यास अधिक महसूल गोळा होऊ शकतो त्याचप्रमाणे गोवा राज्यातून पर्यटक घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्स व इतर आलिशान टुरिस्ट परमिट च्या गाड्यां यांच्याकडून होणारी हप्ते खोरी बंद करून प्रामाणिकपणे महसूल वसूल केल्यास अधिक महसूल मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयात होणारी अफरातफरी यावरही कडक अंकुश ठेवल्यास मोठ्याप्रमाणात शासनाच्या महसूल ची चोरी थांबवून जास्तीत जास्त करही गोळा होईल व आमच्या जिल्ह्यातील सामान्य मालवाहक व्यावसायिकांचा होणारा त्रास निदान कोरोना काळापुरता तरी कमी होईल.

कोरोना परिस्थितीमुळे राहिलेल्या थकित कर्जाला कंटाळून जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याप्रमाणे इतर जिल्ह्यात आत्महत्या होत आहेत.तसे तर आमच्या जिल्ह्यात झाले तर याला स्थानिक प्रशासन जबाबदार असेल.याची कृपया येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन यामध्ये लक्ष घालण्याची आम्ही मनसेच्या वतीने माननीय पालकमंत्री यांना विनंती करत आहोत‌.

जर का सिंधुदुर्ग आरटीओ विभागभरारी पथकामार्फत होणारी ही कारवाई जर थांबली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग माननीय माजी आमदार तथा राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली त्या आरटीओ कार्यालयावर मनसे स्टाईल धडक दिली जाईल असे मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आज कुडाळ येथे मीडिया शी बोलताना सांगितले.

अभिप्राय द्या..