सावंतवाडी /-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुकाध्यक्ष स्मिता वागळे यांनी दि. 17 मार्च रोजी सावंतवाडी येथील इन्सुलि गावात महिलांचा गौरव व महिलांची आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित केला .यामध्ये कोविड-19 काळात कोरोना योद्धा म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा वर्कर्स , नर्स, अंगणवाडी सेविका आशा कर्तृत्ववान महिलांना जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांच्या हस्ते महिलांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मूळव्याध तज्ज्ञ सौ. भाग्यश्री साखरकर (BAMS) आयुर्वेदाचार्य शल्य चिकित्सक गुदरोग तज्ज्ञ यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप महिला काँग्रेस अध्यक्षा यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी 90% महिलांमध्ये आजार असल्याचे निष्पन्न झाले. याचा लाभ जवळजवळ तीस महिलांनी घेतला अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केल्याबद्दल तेथील महिलांनी सिंधुदुर्ग महिला कॉंग्रेसचे विशेष आभार मानले.यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनीसुद्धा कार्यक्रमाची विशेष प्रशंसा केली व मार्गदर्शनही केले .