कणकवली/-

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेल्या पाच महिन्यापासून फॅक्चर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑपरेशन टेबल नादुरुस्त झाले आहे. या ऑपरेशन टेबलच्या मागणीसाठी कणकवली रुग्णालय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सक ७-८ वेळा पत्रव्यवहार करुन देखील दुर्लक्ष केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून एक महिला व अन्य फॅक्चर रुग्ण शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालयात अडकून आहे, त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शस्त्रक्रिया टेबल न दिल्यास कणकवली भाजपच्यावतीने घेराव घालणार असल्याचा इशारा सरचिटणीस,माजी सभापती महेश गुरव यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय जाहीर झाल्यानंतर गेले पाच महिने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक ऑपरेशन टेबल बंद असल्याने काम करता येत नाही.अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून उपचारासाठी कणकवलीत पाठवण्यात येते, सध्याच्या परिस्थितीत एकीकडे रुग्ण कोरोणाच्या संकटात घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करुन ठेवल्यामुळे आणखीन भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दारुम येथील महिला वनिता मारुती तळेकर या गेल्या आठ दिवसांपासून फॅक्चर झालेल्या ऑपरेशनसाठी उपजिल्हा रुग्णालयात आहे.यासंदर्भात रुग्णालय अधीक्षकांची संपर्क साधल्यानंतर ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक असलेले टेबल नसल्याचे ते सांगत आहेत.जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन टेबल तात्पुरते कणकवली उपजिल्हा रुग्णालयला द्यावे.रुग्णांची गैरसोय थांबवावी, अन्यथा कणकवली भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकाना घेराव घालणार असल्याचा इशारा महेश गुरव यांनी दिला आहे.
फॅक्चर शस्त्रक्रिया करण्यासाठी असलेले इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक टेबल रिपेअर किंवा नवीन देण्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांना आठ ते दहा वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहेत.संबंधित रिपेरिंग करणारी कंपनी येऊन देखील ते टेबल रिपेअर झालेले नाही.त्यामुळे फॅक्चर रुग्णांची गैरसोय आहे,याची जाणीव जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ठेवावी.ओरस रुग्णालयातून देखील फॅक्चर रूग्णांना कणकवलीत पाठवण्यात येत आहे. त्या सर्वांचा विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणी देखील महेश गुरव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page