वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात कोव्हीड १९ (कोरोना) सक्रिय रुग्णसंख्या ४ इतकी असून वेंगुर्ले शहर १, रेडी २ व परुळे १ अशी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
कोव्हीड १९ (कोरोना) ची परिस्थिती उद्भवल्यापासून तालुक्यात एकूण ५४९ रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली.शासन आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय,शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे मंगळवार व रविवार वगळता दररोज सकाळी ९ वा. ते ५ वा. या वेळेत,तसेच तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सकाळी ९ वा. ते सायंकाळी ५ वा. या वेळेत राबविण्यात येत आहे. परुळे प्रा.आ.केंद्र येथे पुढील आठवड्यात लसीकरण सुरु होईल.कोव्हिड १९ लसीकरणासाठी अगोदर नोंदणीची गरज नसून आधार कार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. वय ६० वर्षावरील आणि ४५ ते ५९ वयोगटातील ज्यांना कॅन्सर, किडनी,लिव्हर चे आजार तसेच बऱ्याच वर्षांपासून डायबिटीस, रक्तदाब आजार असलेल्याना लस देण्यात येईल. ४५ वर्षावरील लोकांनी आजाराचे डॉ. प्रमाणपत्र अथवा फाईल सोबत आणावी,असे आवाहन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.तसेच मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टनसिंग यांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.