रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रा.पं.परबवाडा यांच्यावतीने सबला उपक्रम..

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रा.पं.परबवाडा यांच्यावतीने सबला उपक्रम..

वेंगुर्ला /-

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी “सबला” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गावातील महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व कळावे व मासिकपाळी काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती मिळावी,यासाठी या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.धनश्री पाटिल या होत्या. यावेळी झोनल रोटरॅक्ट रिप्रेझेंनटेटिव्ह रोट.स्वप्निल परब, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन चे प्रेसिडेंट रोट.अभिषेक साळगावकर, इव्हेंट चेअरमेन रोट.साहिली निनावे,रोट.नेहा गावडे, रोट.प्रितीश लाड, रोट.शुभम हुले, रोट. तथा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, ग्लानेस फर्नांडिस, अर्चना परब, कृतिका साटेलकर, सचिव दर्शना परब,सी.आर.पी.गौरी सावंत व ऍना डिसोझा आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच पपू परब, उपसरपंच संतोष सावंत व माजी उपसरपंच संजय मळगावकर यांनी सहकार्य केले.

अभिप्राय द्या..