मालवण /-
मच्छीमाराना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेज मधील जाचक अटी शिथिल करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचे मालवण येथे मच्छीमारांच्या वतीने आभार मानत सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांचेही मच्छीमारांनी विशेष आभार मानले आहेत.यावेळी मत्स्य विक्रेत्या महिला, मच्छिमार व्यावसायिक, ट्रॉलर मालक संघटना मालवण यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, विकी चोपडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.