१००० लोकांचा अपघात विमा उतरवणार : सुरेश दळवी

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा दळवी कॉम्प्लेक्स मध्ये पार पडला, यावेळी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची कार्यकारिणी वर पदाधिकारी म्हणून निवडही करण्यात आली त्यांना माजी राज्य मंत्री प्रवीण भोसले व ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते व जिल्हा बॅंक उपाध्यक्ष सुरेश दळवी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.

यावेळी बोलताना प्रवीण भोसले यांनी दोडामार्गमधील कार्यकर्ते व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे. त्यामुळे राष्ट्रवादि दोडामार्ग तालुक्यात वाढण्यास पोषक वातावरण असून तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पोहचली पाहिजे तरच दोडामार्गात आगामी काळात राष्ट्रवादी नंबर १ चा पक्ष होईल असे ते म्हणाले.

तर राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते व जिल्हा बॅंक उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस ही लोकांच्या मनात रुजू लागली असून आज युवा महिला ह्या या पक्षाकडे येत आहेत, विविध मेळावे घेऊन पक्ष मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले तर आपल्या माध्यमातून १००० लोकांचे जिल्हा बॅंकमध्ये विमा उतरवणार असल्याचे ते म्हणाले यासाठी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर यांच्याकडे नावे नोंदवावीत असे सांगितले.

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अनेक पक्ष प्रवेश करून आपली ताकद वाढवत आहे, यामुळे इतर पक्ष मात्र या रणनीतीत मागे पडताना दिसत आहेत.

यावेळी लोकनेते सुरेश दळवी माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले, दिपक जाधव (जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग), बाबा खतिब (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यक सेल), पुंडलीक दळवी (तालुकाध्यक्ष सावंतवाडी, जिल्हाध्यक्ष व्यापार व उद्योग सेल), चित्रा देसाई (महिला जिल्हाध्यक्ष व्यापार व उद्योग सेल), संदिप गवस(जिल्हा उपाध्यक्ष), जावेद शेख (सावंतवाडी तालुकाध्यक्ष अल्पसंख्यक सेल), प्रदिप चांदेलकर (दोडामार्ग तालुकाध्यक्ष), सुदेश तुळसकर (शहरअध्यक्ष दोडामार्ग),माजी नगरसेवक पांडुरंग ठाकूर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page