यशराज प्रेरणा गृप तर्फे महिला कोव्हिड योद्यांचा सन्मान..
आचरा /-
महिलांनी महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास महिलांचे सबलीकरण व्हायला वेळ लागणार नसल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधून यशराज प्रेरणा गृप तर्फे कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महिला कोव्हिड योद्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते या वेळी त्यांच्या सोबत यशराज प्रेरणा गृप चे मंदार सरजोशी, कार्यक्रमाच्या आध्यक्षा केंद्रप्रमुख सुगंधा गुरव , सरपंच प्रणया टेमकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, पोलीस काॅन्स्टेबल सौ मिनाक्षी देसाई, आरोग्य सेविका सौ संगीता पेंढारकर,मानसी सरजोशी, राजेश भिरवंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कोरोना काळात आचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, होमगार्ड, प्राथमिक शिक्षक, पत्रकार यांचा पर्यावरण संवर्धन करणारे सुपारीचे झाड, प्लॅस्टीक बंदीचा मुलमंत्र देणारी कापडी पिशवी देवून गौरविण्यात आले. या वेळी बोलताना केंद्रप्रमुख सुगंधा गुरव यांनी जबाबदारी, कर्तव्यातून आपण काम केले म्हणून पहिल्या टप्प्यातील कोरोनाचे संकट दूर झाले.तीच सावधानता बाळगत पुन्हा येणारे कोरोना संकट दूर करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहूया असे सांगितले.या वेळी कोव्हिड योद्या पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, आरोग्य सेविका संगीता पेंढारकर, होमगार्ड एकता चव्हाण, आशा स्वयंसेविका अस्मिता आचरेकर यांनी कोव्हिड काळातील आपले अनुभव कथन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशराज प्रेरणा गृपच्याआचरेकर, वृषाली कांबळी,मिनल कोदे, प्राजक्ता आचरेकर,धनश्री आचरेकर यांसह अन्य सहकारयांनी विशेष परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भिरवंडेकर यांनी तर आभार नीधी मुणगेकर यांनी मानले