वेंगुर्ला पंचायत समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न

वेंगुर्ला पंचायत समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न

वेंगुर्ला /-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष वेंगुर्ला व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, कक्ष अधिकारी रेडकर, अधिक्षक कोरगांवकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सामंत , विस्तार अधिकारी शिक्षण वंदना परब , विस्तार अधिकारी सांख्यिकी दिशा चौकेकर व बॅक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थांपक वर्मा,आत्मा समन्वयक गोळम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. गोळम यांनी एसआरआय (SRI), भाजीपाला लागवड विक्री केंद्र व कृषी विषयक व्यवसाय याबद्दल माहिती दिली.बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक वर्मा यांनी ही चांगल्या प्रकारे माहिती दिली. याठिकाणी बॅक ऑफ इंडिया चा जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला समुहांना कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी अस्मिता योजना, सुमतीबाई सुकळीकर योजना, परसबाग ,आरोग्य विषयक योजना व इतर शासनाच्या अनेक योजनांविषयी माहिती देण्यात आली. तसेच पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्राचीन काळापासून महिलांना गौरविण्यात आले आहे. पुर्वजांनी आपल्याला प्रेरणा दिली. स्त्री पुरूष भेदभाव करू नये. सर्वांना समान संधी द्यावी. महिलांनी सक्षमपणे काम केले पाहिजे. व्यवसाय वाढविणे, मार्केटिंग बाबतीत चांगला निर्णय घेणे व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच सभापती अनुश्री कांबळी यांनी महिला दिनाचे महत्व स्पष्ट केले.आत्मसन्मान जोपासला पाहिजे.आपले हक्क व मत सक्षमपणे मांडले पाहिजेत. स्वतःसाठी वेळ द्यावा. मनमोकळे पणाने जगावे चांगले व्यवसाय निवडा व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी तालुकास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना जाधव यांनी केले आभार रेखा परूळेकर यांनी केले.

अभिप्राय द्या..