कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र पिंगुळी येथील समाधिस्त प पु सद्गुरू समर्थ राऊळ महाराज मठाचे मठाधिपती प पु स स अण्णा महाराज यांचा 76 वा वाढदिवस दिनांक 10 मार्च 2021 ते 13 मार्च 2021 या कालावधीत विविध धार्मिक ,आरोग्य विषयक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमानी नेहमीप्रमाणे हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे ठरविले होते.
परंतु महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णाची वाढ लक्षात घेऊन शासनाने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यावर निर्बन्ध आल्याने यंदाचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भक्तमंडळी च्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे भक्तमंडळी नी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग करून गर्दी करू नये प पु विनायक अण्णा महाराज हे आपल्या ट्रस्ट मार्फत विविध सामाजउपयोगी कार्यक्रम राबवीत असतात त्यामध्ये अपंग व्यक्तींना जयपूर फूट वाटप ,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ,सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आदी काशर्यक्रमांचा समावेश असतो
मात्र यावर्षी महाराष्ट्र शासनाचे आदेश तसेच जिल्हाधिकारि सिंधुदुर्ग यांनी घातलेले निर्बन्ध यांचे पालन करून हा सोहळा संपन्न होणार आहे कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या वर्षी होणार नाहीत
समाधी मंदिर बाहेर कोणी ही दुकाने लावू नयेत तसेच उत्सवाच्या काळात शासनाच्या सूचक व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे ,मास्क, सॅनिटायजर व थर्मल चेकिंग करूनच मंदिरात प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी ,भक्तमंडळींनी स्वतःची व समाजाची काळजी घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन प पु विनायक अण्णा राऊळ महाराज चैरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री विनायक (अण्णा )राऊळ यांनी केले आहे.