मालवण /-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन भावी कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी संघटनेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही संघटनेने दिली.यावेळी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नही मांडण्यात आले.यामध्ये आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदली टप्पा क्र.५ सिंधुदुर्गचा समावेश होण्यासाठी मा.कपिल पाटील साहेब व तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मा.हेमंत वसेकर व शिक्षणाधिकारी मा.एकनाथ आंबोकर यांच्याशी झालेल्या झुम मिटींग चर्चा याची माहिती दिली. डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांचे हिशोब तक्त्यातील तफावती व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम प्रश्र्न , वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूरी बाबत .शाळेची वेळ ८ मार्च पासून ८ते११ अशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दरमहा विलंबाने होणारे वेतन यासाठी सिएमपी प्रणाली द्वारे वेतन करण्या बाबत थोडक्यात चर्चा करण्यात आली. लवकरच शाळा व शिक्षकांचे प्रश्न याबाबत अधिकृत भेट मिळण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यावर नजीकच्या काळात भेटीसाठी वेळ देण्यास तात्काळ मान्यता दिली.
संघटनेच्या वतीने यावेळी राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, कार्याध्यक्ष लक्ष्मिकांत कराड, जिल्हा मुख्य संघटक रामचंद्र डोईफोडे, जिल्हा प्रतिनिधी लहू पाटील, रामचंद्र सातवसे, मालवण तालुका अध्यक्ष संतोष कोचरेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वसंत गर्कल , मालवण सचिव संतोष परब, संघटना सदस्य सागर कु-हाडे, सचिन डोळस, राकेश अहिरे आदी उपस्थित होते.