वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी तालुक्यात ठिकठिकाणी भक्तीमय वातावरणात व
साधेपणाने साजरी करण्यात आली.यावर्षी कोव्हीड १९ (कोरोना) प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणी देवस्थान ,स्थानिक ग्रामस्थ व सर्वांच्या सहकार्याने व सुयोग्य नियोजनाने धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.तालुक्यातील रेडी येथील जागृत द्विभुज गणपती मंदिर,उभादांडा येथील प्रसिद्ध गणपती मंदिर,वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर,जुना एस. टी. स्टँड गणपती मंदिर,वेंगुर्ले कॅम्प येथील श्री गणेश मंदिर तसेच तालुक्यातील अन्य विविध भागात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी शासन नियम पाळून दर्शन घेतले.दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मास्क,सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टनसिंग यांचे पालन करून गर्दी न करता श्री गणेशाचे दर्शन घेतले.
वेंगुर्ला