सिंधुदुर्गात ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

सिंधुदुर्गात ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

सावंतवाडी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत दक्षिण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यादाच महाराष्ट्र साऊथ झोन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बुधवार दि.23 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.यासाठी सावंतवाडीतील मुक्ताई अकॅडमीचे संचालक आणि बुद्धिबळ व कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचे सहकार्य लाभले आहे.चेज सर्कलचे संचालक इंटरनॅशनल आर्बिटर विवेक सोहनी यांच्या आयोजनाखाली कै.अनिल जे.कानविंदे स्मृती प्रित्यर्थ घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण रोख रक्कम रु.१० हजाराची 75 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्याना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खुल्या,महिला आणि छोट्या गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंसाठी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंसाठी ही मोठी पर्वणीच आहे.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिबळपटुंसोबत रत्नागिरी, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर या जिल्ह्यातील बुद्धिबळपटुंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.

अभिप्राय द्या..