रेडी गणपती अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी

रेडी गणपती अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी

वेंगुर्ला /-

संपुर्ण “जगभर” प्रसिद्ध पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त पहाटे ५.३० वा. अभिषेक, सकाळी ६ वा. पूजापाठ,सकाळी ६.३० वा. आरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.कोव्हीड १९ (कोरोना) प्रादुर्भावामुळे सर्व कार्यक्रम विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत साजरे केले जाणार आहेत.भक्त – भाविकांनी मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टनसिंग आदी शासन नियमांचे पालन करून तसेच गर्दी न करता श्री दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री गजानन देवस्थान रेडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..