मसुरे /-
कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा दिना निमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ज्यांच्या जन्म दिना निमित्त हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो त्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या पुस्तकाचे मुलांकडून वाचन करण्यात आले. या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांसह ग्रामस्थानी घेतला.
या प्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.उदय परब, कार्यवाह श्री.प्रविण पारकर, उपाध्यक्ष श्री.मधुसुदन परुळेकर,खजिनदार श्री.गजानन सुर्वे, सदस्य श्री.पांडुरंग राणे, श्री.प्रविण परब, ग्रंथपाल सौ.साक्षी मेस्त्री, कर्मचारी श्री.महेश साळकर, पोलिस पाटील सौ.परब, ग्राम पंचायत कर्मचारी कु.अश्विनी लाड आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.