वेंगुर्ला /-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज विविध प्रकारच्या उद्योगासाठी जाहीर केले. याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ( PMFME ) सन २०२० ते २०२५ या पाच वर्षे कालावधीसाठी सुरु केली आहे.सदर योजने अंतर्गत DAY – NRLM मधील स्थापित समुह जे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या व्यवसाय वृद्धी करीता बीज भांडवल देण्याची तरतूद करण्यात आली आहे .सदर योजनेसाठी कृषी विभाग – महाराष्ट्र शासन हा नोडल विभाग व कृषी आयुक्तालय – पुणे हे नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहेत.
PMFME योजनेमार्फत अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगामधील स्वयं सहाययता समुहांसाठी विशेषतः प्राधान्य देण्यात आलेले आहे .या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहाययता समुह , ग्रामसंघ, प्रभाग संघ यांना भांडवल गुंतवणुकीसह संपूर्ण मूल्यवर्धक साखळीमधील गुंतवणूकीवर ३५ % पर्यंत Credit Link Grant उपलब्ध होणार आहे . तसेच ४०,००० रुपये प्रति स्वयं सहाययता समुह सदस्य अशा पध्दतीने बीज भांडवल ( Seed Capital ) देण्याची तरतूद आहे.या व्यतिरिक्त अन्नपदार्थ प्रक्रिया मधील उद्योगांसाठी आवश्यक एकत्रित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी , स्वयं सहाय्यता समुह , ग्रामसंघ , प्रभाग संघ यांना ३५ % पर्यंत Credit Link Grant उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
समुदाय संस्थेसाठी बीज भांडवल ( Seed Capital ) संपूर्णतः अनुदान स्वरुपात असून लाभ घेणाऱ्या समुह सदस्यांसाठी हे बिज भांडवल ( Seed Capital ) वार्षिक ३%च्या व्याज दराने कर्ज स्वरुपात असणार आहे. सदर कर्जाचा परतावा करताना व्याजाची विभागणी – १% स्वयं सहाय्यता समुह , १% ग्रामसंघ व १% प्रभागसंघ या स्वरूपात असणार आहे.तरी या योजनेचा जास्तीत जास्त बचतगटांच्या महीलांनी फायदा घेऊन आत्मनिर्भर बनावे,असे आवाहन वेंगुर्ले महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा माजी पं. स.उपसभापती स्मिता दामले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page