वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोंसुरे वरचीवाडी येथील एकाची आत्महत्या

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोंसुरे वरचीवाडी येथील एकाची आत्महत्या

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोंसुरे वरचीवाडी येथील उमेश सुरेश टाककर (वय ४८) हे आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास लावून मयत स्थितीत आढळून आले.ही घटना काल बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.१५ या मुदतीत घडली.
तालुक्यातील वरची सोंसुरेवाडी येथे उमेश टाककर एकटेच आपल्या घरात राहत असत.
बुधवारी सायंकाळी उशीर झाला तरीही घरात असूनही आतील लाईट सुरू न केल्याने बाजूला रहाणारे आत्माराम टाककर यांनी त्यांना आवाज दिला. मात्र घरातून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आत्माराम यांनी खिडकीतून घरात डोकावले असता उमेश हे दोरीला लटकत असल्याचे दिसून आले. तात्काळ त्यांनी बाजूच्या ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. तसेच पोलिसांनाही कळविले. त्यानुसार शिरोडा पोलीस दूर क्षेत्राच्या पोलीस रंजीता चौहान अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेऊन उमेश टाककर यांचा मृतदेह पंचनामा करून खाली उतरला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात
देण्यात आला.दरम्यान वेंगुर्ले पोलिस स्टेशनचे पीएसआय व्ही. ए. केसरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रंजिता चौहान या करीत आहेत.

अभिप्राय द्या..