श्री.देव रामेश्वर मंदिर हुमरमळा महाशिवरात्री उत्सव गाव मर्यादीत साजरा होणार.;देवस्थान अध्यक्ष अमृत देसाई यांची माहिती..

श्री.देव रामेश्वर मंदिर हुमरमळा महाशिवरात्री उत्सव गाव मर्यादीत साजरा होणार.;देवस्थान अध्यक्ष अमृत देसाई यांची माहिती..

कुडाळ /-

कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नसल्याने गर्दी टाळण्यासाठी सन २०२१ चा महाशिवरात्री उत्सव हुमरमळा वालावल या गावापुरती मर्यादीत साजरा केला जाणार आहे.५ दिवस चालणारा हा उत्सव दि.८ मार्च ते १२ मार्च २०२१ कालावधीत केली जाणारी नियमित धार्मिक कार्ये फक्त हुमरमळा वालावल ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे नियमावली नुसार पार पडली जातील

कोरोना महामारीचा विचार करुन यावर्षी उत्सवात गावाबाहेरील व्यक्तिना खेळ, दुकान, हॉटेल्स लावण्यास सक्त मनाई असेल.त्यामुळे पाहुणे, मित्रमंडळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांना नम्र विनंती की या उत्सवात या सहभागी न होता आपण आहात तेथुनच श्री रामेश्वराचे कृपाशिर्वाद घेवून आम्हांस सहकार्य करावे.असे आवाहन श्री.देव रामेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अध्यक्ष श्री अमृत देसाई उपसमिती, स्थानिक उपसल्लागार समीती रामेश्वर देवस्थान हुमरमळा-वालावल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..