कुडाळ सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवरील अण्णा नाईक परत येणार हा संदेश युवक राष्ट्रवादीने पुसला…

कुडाळ सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवरील अण्णा नाईक परत येणार हा संदेश युवक राष्ट्रवादीने पुसला…

रात्रीस खेळ चाले मालिका व निर्माता यांचा निषेध चित्रीकरण होऊ देणार नाही असा दिला इशारा..

कुडाळ /-

कुडाळ येथील हायवे चे नवीन बांधलेले बस थांबा वर व अन्य सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर “अण्णा नाईक परत येणार” अशा आशयाचे लिहिलेले संदेश आज कुडाळ येथील युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पुसला . रात्रीचा खेळ चाले 3 च्या नवीन सिरीयल च्या प्रमोशन साठी भीती रंगवलेल्या आहेत हायवेलगत असलेल्या नवीन बांधलेला बसस्थानकावर व अन्य ठिकाणी संदेश लिहून कुडाळच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण केलेले आहे.”रात्रीस खेळ चाले” मालिकेच्या निर्मात्यांनी संदेश दिलेल्या भिंती तात्काळ सुस्थितीत कराव्यात अन्यथा युवक राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून या सिरियल चे चित्रीकरण होऊ देणार नाही असे सांगितले. रात्रीचा खेळ चाले या मालिकेचा व निर्मात्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, सरचिटणीस ऍड. हितेश कुडाळकर, मुन्ना उर्फ प्रथमेश दळवी, तालुकाध्यक्ष संकेत शिंदे, उपतालुका अध्यक्ष अमित कोरगावकर, अमित केरकर, आसिफ नाईक व युवक राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..