मसुरे /-
मालवण तालुक्यातील धामापूर गावडेवाडी येथील मूळ रहिवाशी आणि आता मुंबई कळवा येथे राहणाऱ्या जेष्ट समाजसेविका,उत्कृष्ठ गायिका श्रीमती लक्ष्मी लवू गावडे (६५ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. कळवा येथील स्मशान भूमीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले..
लक्ष्मी गावडे यांचे कळवा आणि धामापूर गावा मध्ये सामाजिक, कला क्रीडा क्षेत्रात मोठे नाव होते. आपल्या सुमधुर आवाजाने त्यांनी अनेक गाणी स्वरबद्ध केली होती. तसेच अनेक मोठ्या कार्यक्रमांत त्यांनी गाणी गायली होती. अनेक गरीब कुटुंबाला त्यांनी वेळो वेळी मदतीचा हाथ दिला होता. आरोग्य क्षेत्रा मध्ये त्यांनी अनेकांना मदत केली होती.बारसे विधीला पाळणे गाण्याची त्यांची कला सर्वत्र प्रसिध्द होती. भजन क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अनेक नवेदीत भजनी बुवांना त्यांनी भजन क्षेत्रात आणून मार्गदर्शन केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.मुंबई मुलुंड येथील प्लॅटिनम या हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे यांच्या त्या मातोश्री होत.