प्राथ.शिक्षिका प्रियांका तेरसे यांना जि. परिषदेचा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार..

प्राथ.शिक्षिका प्रियांका तेरसे यांना जि. परिषदेचा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार..

सावंतवाडी /-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडेली जांभरमळा,केंद्र – मठ, ता.वेंगुर्ला शाळेच्या सहाय्यक शिक्षिका *श्रीमती प्रियांका गोविंद तेरसे* यांना सन २०१८-१९ चा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत दिला जाणारा *मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार* देण्यात आला आहे.जिल्ह्यात मुलींचा पट वाढण्यासाठी विशेष काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो.रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन श्रीमती.तेरसे यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल वेंगुर्ला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री.संतोष गोसावी,मठ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.महादेव आव्हाड, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैभवी चोपडेकर, शाळा व्यवस्थापन समिती,आडेली अध्यक्ष श्री.गणेश धुरी तसेच पालक,विद्यार्थीवर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..