सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची जिल्हा कार्यकारणी जाहिर…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची जिल्हा कार्यकारणी जाहिर…

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते श्वेतांबरी रजपूत यांची युवती उपाध्यक्ष पदी नियुक्ती …

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली या बैठकीत तरुणींच्या विविध समस्या वर चर्चा करण्यात आली व ती सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे एकमताने ठरवण्यात आले. तसेच युवतींच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी विविध स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले. अमित सामंत यांनी सर्व युवतीना पक्ष वाढी संधर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा युवती अध्यक्ष संपदा तुळसकर यांनी युवती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली सरचिटणीस पदी नम्रता चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष पदी तन्वी आंद्रे, कणकली तालुकाध्यक्ष पदी प्राजक्ता शिंदे, कुडाळ तालुकाध्यक्ष पदी हेमांगी वराडकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदि श्रद्धा राऊळ. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, सरचिटणीस ऍड.हितेश कुडाळकर, हमीद शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..