श्री देव मानसीश्वरचे माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले दर्शन

श्री देव मानसीश्वरचे माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ला /-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून वेंगुर्ले-उभादांडा येथील अतिशय जागृत असलेल्या श्री देव मानसीश्वर देवाचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीतचं साजरा होत आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी जत्रोत्सवाला भेट देत देवाचे दर्शन घेतले.
नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव मानसीश्वराच्या जत्रौत्सवात देवाचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी व बोलण्यासाठी भाविक शिस्तबध्द रित्या शासनाचे नियम पाळून दर्शनासाठी येत होते.
दरवर्षी सकाळपासूनच देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा असतात. मात्र यावर्षी मानसीश्वराचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीत आज सकाळ पासून सुरु झाला. दिवसभर देवाला शिड देण्यासाठी भाविक येत होते. आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन गर्दीवर लक्ष ठेवून होते. रात्रौ पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग बत्तीच्या प्रकाशात होऊन जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.
वेंगुर्ले येथील श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीत साजरा करण्यात येत असला तरी यंदा कोरोनाचे राज्यात सावट आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले उभादांडा ग्रामस्थ हा जत्रौत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, जास्त गर्दी होऊ नये यासाठी स्वतःहून प्रयत्न करत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क व सॅनिटाईजर वापरून दर्शनासाठी पाठवित आहेत. तर कुठेही गर्दी होऊ नये याचीही दक्षता ग्रामस्थ घेत आहेत. दरम्यान दुपारी माजी खासदार निलेश राणे यांनी जत्रोत्सवाला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास ऊर्फ दादा कुबल, प्रितेष राऊळ, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुस्कर, तुषार साळगावकर, दाजी धुरी, भुषण आंगचेकर, हितेश धुरी, हेमंत गावडे, भूषण सारंग, महिला आघाडीच्या सुजाता देसाई, नगरसेविका सौ.साक्षी पेडणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..