सावंतवाडी /-
फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( सामाजिक न्याय विभाग) ची बैठक संपन्न झाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मा.नामदार श्री.जयंतराव पाटील साहेब(जलसंपदामंत्री महाराष्ट्र )यांच्या आदेशान्वये तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा.अमितजी सामंत साहेब यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग सामाजिक न्याय विभागाची आज बैठक सावंतवाडी येथे तालुकाध्यक्ष श्री. पुंडलीक दळवी यांच्या संपर्क कार्यालयात मा.जिल्हाध्यक्ष दिपक जाधव (सामाजिक न्याय विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी ही ग्रामपंचायत पंचयत समिती जिल्हा परिषद व विधानसभा या आधारावर असेल व प्रत्येक पदाधिकारी यांनी याचा अभ्यास करुन दर महीन्याला आढाव बैठक घेउन सादर करायच्या सुचना दिल्या लवकरच सामाजिक न्याय विभागाची जंबो कार्यकारणी जाहिर करण्यात येइल असे सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस म्हणुन मालवण चे श्री.योगेश मधुकर वराडकर यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. याच बरोबर वेंगुर्ला तालुकाध्यक्ष म्हणुन श्री. मोहन सखाराम जाधव व मालवण तालुकाध्यक्ष म्हणुन श्री. राजेंद्र आत्माराम वराडकर यांना ही नियुक्तिपत्र देण्यात आले.
यावेळी सदर बैठकीस खालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.
पुंडलीक दळवी सावंतवाडी तालुकाध्यक्ष व व्यापारउद्योग सेल जिल्हाध्यक्ष
चित्रा बाबर देसाई व्यापारउद्योग महिला जिल्हाध्यक्ष
जावेद शेख अल्पसंख्यक सेल सावंतवाडी तालुकाध्यक्ष
देवा टेमकर सावंतवाडी शहर अध्यक्ष
प्रसाद दळवी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदवीधर सेल
राजगुरू मॅडम
हिदायतुल्ला खान व्यापारउद्योग जिल्हा कार्याध्यक्ष अरुण जाधव
संदिप पिंगुळकर सुप्रिया पिंगुळकर महीला जिल्हा संघटक सामाजिक न्याय विभाग तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सचिन पाटकर यांनी केले.