वेंगुर्ला /-
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून,
गोवा विमानतळ प्राधिकरण,
मानव साधन विकास संस्था व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे वेंगुर्ले पं. स.माजी उपसभापती तसेच भाजपा महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले यांच्या हस्ते वेतोरे हायस्कूल मधील १० मुलींना सायकल चे वाटप करण्यात आले.
स्मिता दामले यांनी सायकलच्या चावी विद्यार्थ्यांना सुपूर्द करून सायकल वाटप चे उद्घाटन केले.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, स्मिता दामले,ओवी पवार,पांडुरंग वगरे,तुकाराम भोगण,संजय परब आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर यांनी जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांचेकडे विद्यालयातील मुलींना सायकल मिळाव्यात यासाठी प्रस्ताव केला होता,त्याप्रमाणे तो मंजूर होऊन त्याचे वितरण स्मिता दामले यांच्या हस्ते करण्यात आले.