कुर्ली येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ चे आयोजन

कुर्ली येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ चे आयोजन

प्रमुख वक्ते मराठा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय ऍड सुहास सावंत

वैभववाडी/-

शिवमहोत्सव आयोजन समिती कुर्लीच्या वतीने कुर्ली, तालुका ,वैभववाडी येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी उपसभापती तथा कुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गटांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच कुर्ली आयडॉल आणि कुर्ली सुपर डान्सर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मराठा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत यांचे व्याख्यान सायंकाळी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ब्राम्हदेव शैक्षणिक, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नामदेव मराठे, मंडळ अधिकारी सांगवे दिलीप पाटील,नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवसन्मान, शिवसत्कार तसेच कोविडयोद्धा सन्मान केले जाणार आहेत.
सर्व कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून साधेपनाने साजरे केले जाणार आहेत. सर्व शिवप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवमहोत्सव आयोजन समिती कुर्लीच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..