वैभववाडीत वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले

वैभववाडीत वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले

वैभववाडी /-

तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ४.वाजण्याच्या सुमारास वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले.अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली.या अवकाळी पावसाने काजू व आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भित्ती शेतकरी व्यक्त करीत आहेत.तर वादळाने फोंडा वैभववाडी दरम्यान रस्त्यावर झाडे उमळून पडल्यामुळे काही काळ वाहातूक ठप्प झाली होती.स्थानिक ग्रामस्थांनी झाडे बाजूला करुन वाहातूक सुरळीत सुरु केली आहे.
तालुक्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते.बुधवारी राञौ उशीरा तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.दुपारनंतर जोरदार अचानक जोरदार वादळी पावसाने तालुक्याला झोडपून काढले.यामध्ये भुईबावडा, खांबाळे, कुर्ली, अरुळेसह अनेक भागात जोरदार गारपीठ झाली.गारपीठीमुळे काही काळ सर्वञ गारांचा पांढरा शुभ्र सडा पडल्याचा भास होता.बच्चे कंपनीने या गारपीठींचा मनमुराध आनंद घेतला. तर जोरदार वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उमळून मोडून पडली आहेत.खांबाळे येथील अशोक दत्ताराम पवार यांच्या घरावरची कौले वादळाने उडाल्यामुळे त्यांचे नूकसान झाले आहे.तर खांबाळे येथे रस्त्यावर अनेक झाडे पडल्यामुळे काही काळ वाहातूक ठप्प झाली होती.स्थानिक ग्रामस्थांनी पडलेली झाडे बाजूला करुन वाहातूक सुरळीत केली आहे.तर तालुक्यात अन्यठिकाणीही नुकसान झाले आहे.माञ उशीरापर्यंत याबाबत नोंद करण्यात आलेली नाही.
या अवकाळी पावसाने ऐन बहरात असलेल्या काजू व आंबा पिकांवर मोठा परिणाम होणार असून पिकाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे अधिच अडचणीत असलेला शेतकरी संकटात सापडला आहे.

अभिप्राय द्या..